Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedशाळांपाठोपाठ आता वसतीगृहे सुरु होणार

शाळांपाठोपाठ आता वसतीगृहे सुरु होणार

सोमवारपासून (२४ जानेवारी)राज्यातील सर्व शाळा (school reopen)सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचा निर्णय राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad)यांनी गुरुवारी जाहीर केला होता. त्यानंतर आता वसतिगृहे आणि निवासी शाळाही सुरु होणार आहेत.

अखेर सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु

- Advertisement -

राज्यात सोमवार दिनांक २४ जानेवारीपासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा (school reopen)सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे (hostel)देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

लसीकरण झालेल्यांचे काॅलेज बंद, पण मुलांच्या शाळा सुरु, काय आहे घोळ?

महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत, त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या