Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशफुफ्फुसांमध्ये ९५ टक्के संक्रमण, डॉक्टरांनी पाठवून दिले घरी, त्यानंतरही कोरोनावर मात

फुफ्फुसांमध्ये ९५ टक्के संक्रमण, डॉक्टरांनी पाठवून दिले घरी, त्यानंतरही कोरोनावर मात

उदयपूर

कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. परंतु कोरोनावर मात करणारे अनेक आहेत. सकारात्मक विचार (positive thinking) कोरोनावर सर्वात मोठे औषध ठरत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. फुफ्फुसांमध्ये ९५ टक्के संक्रमण झाल्यामुळे उपचार शक्य नसल्याचे सांगत डॉक्टरांनी घरी पाठवले. विशेष म्हणजे या रुग्णास कर्करोग (Cancer) होता. त्यानंतर कोरोनावर मात करत सर्वात मोठे औषध आपले विचार असल्याचे दाखवून दिले.

- Advertisement -

खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील शिशोदा हे गाव. येथील ४६ वर्षीय महिला नर्बदा पालीवाल यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. ताप, हातपाय दुखणे, खोकला ही लक्षणे दिसल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना नाथद्वारा रुग्णालयात आणले. त्यांचे भाऊ नंदलाल पालीवाल यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करतांना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. परंतु फुफ्फुसांमध्ये संक्रमण दिसून आले. त्यामुळे रुग्णास उदयपूरला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. उदयपूरच्या रुग्णालयात सीटी स्कॅन केले. त्यात २५ पैकी २३ स्कोर म्हणजेच ९५ टक्के संक्रमण फुफ्फुसांमध्ये दिसले. तसेच त्यांना कर्करोगही आहे. यामुळे उदयपूरमधील डॉक्टरांनी त्यांना रिकव्हर करणे अशक्य असल्याचे सांगत घरी पाठवून दिले. यानंतर कुटुंबियांना धक्का बसला.

डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर नर्बदा यांनी सकारात्मक विचार सुरु ठेवला. आपले फुफ्फुस केवळ ५ टक्के संक्रमित आहे, आपण कोरोनावर नक्कीच मात करु, हा विचार करुन घरीच उपचार सुरु केले. या विचारसरणीने त्यांच्यांसाठी ‘संजवनी बुटी’चे काम केले. त्यांनी कोरोनावर मात केली असून आता सामान्य जीवन जगत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या