काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक

लॉकडाऊन वाढणार का? यावर निर्णय होणार
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई

पदोन्नतीच्या मुद्यावरुन काँग्रेस मंत्र्यांची नाराजी तसेच काल शरद पवार व मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राजकीय वातावरण तापलेले असतांना बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागू केलेला लॉकडाऊन (Lockdown) १ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे आता हा लॉकडाऊन आणखी वाढणार की नाही? याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मालेगाव बाँबस्फोटाचे तपासाधिकारी सीबीआयचे संचालक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीतील वृत्त आले नसले तरी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची गुरुवारी सकाळी लगबग होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील पोहोचले आहे. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पदोन्नतीवरुन काँग्रेस नाराज

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विषयावर काँग्रेस पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, असा आक्रमक पवित्रा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न उपस्थित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणतात, सरकार पडणार

सध्या महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू आहे. महाराष्ट्र झोपेत असताना जसे सरकार आले, तसे महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. माथेराना नगरपालिकेतील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी आज पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, 'अठरा महिन्यांपूर्वी सरकार आलं तेव्हाच महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरी जाण्याची मानसिकता बनवली आहे. आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे. तरीही अठरा महिने हे सरकार टिकले आहे. सध्या त्यांचा बोनस काळ सुरू आहे. त्यामुळे जसे झोपेत असताना सरकार आले, तसे महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जळगावनंतर मुक्ताईनगरात भाजपला धक्का : ६ नगरसेवक शिवसेनेत
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com