Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रइंधनाचा भडका, उत्तर महाराष्ट्रात पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार

इंधनाचा भडका, उत्तर महाराष्ट्रात पेट्रोलनंतर डिझेलही शंभरीपार

पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली. चालू महिन्यात तीन दिवस वगळता उर्वरित १२ दिवस दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात पेट्रोलनंतर आता डिझेलने १०० गाठली आहे.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत असून कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर ७९ डाॅलरच्या जवळपास अाहेत. तेल उत्पादक देश ‘अाेपेक’ राष्ट्रांनी कच्च्या तेलाची अांतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढूनही उत्पादन मात्र मर्यादितच ठेवले अाहे. आज इंधनाचे दर वाढले असून त्यामुळे नाशिकमध्येही डिझेलचे दर शंभरीपार पाेहाेचले अाहेत. इंधन दराचा हा अाजपर्यंतचा उच्चांक अाहे.

दर कमी हाेण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त हाेत असतानाच कंपन्यांनी १४ अाॅक्टाेबरला डिझेलचे दर ३६ पैसे तर पेट्राेलचे दर ३३ पैशांनी वाढविले. यामुळे परभणीपाठाेपाठ अाता नाशिकमध्येही डिझेेलचे दर १००.५३ रुपयांवर तर पेट्राेलचे दर १११.४२ रुपये प्रतिलिटरवर जाऊन पाेहाेचले आहेत.

मंदाताई खडसे यांना दिलासा, उच्च न्यायालयाने दिले हे आदेश

जाणून घ्या, कुठे किती दर

शहर पेट्रोल डिझेल

नाशिक १११.४२ — १००.५४

नगर ११०.६२ —- ९९.७७

जळगाव ११२.३४ — १०१.३४

धुळे ११०.६५ — ९९.९०

नंदुरबार ११०.६२ — ९९.७७

कच्च्या तेलाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्यामुळे गेल्या काही दिवसात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांच्या बैठकीत दररोज 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. साहजिकच भारतात पेट्रोल-डिझेल दरांचा भडका उडाला असून कित्येक शहरांमध्ये सर्वोच्च किमतीपर्यंत मजल मारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या