मुंबई

पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नाही, एकही पोलिस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत, असे धक्कादायक दावा निवृत्त पोलीस आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला.

काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकला होता. यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रूपये दरमहा जमा करण्याचे टार्गेट दिल्याते सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, “ एकही पोलीस स्थानक नाही ज्या ठिकाणी पैसे जमा होत नाहीत. पोलीस दलामध्ये पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारी नाही. प्रत्येक पोलीस स्थानक राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. या ठिकाणी राजकारण्यांना हव्या तशा नियुक्त्या होतात. ”

पोलिस राजकीय पक्षाचा पोलिस

पोलिस आता पोलिस राहिला नाही तो राजकीय पक्षाचा पोलिस झाला आहे. त्याला पैसे गोळे करण्याच्या कामावर राहिल्यावर तर तो तक्रार दाखल करणे हे त्याचे काम करतच नाही. मग तो हवी असणाऱ्या पोस्टींगसाठी प्रयत्न केले जाते, असे बोरवणकर यांनी सांगितले.

वाझेंना पाठवळ असणार

सचिन वाझे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता मीरा बोरवणकर म्हणाल्या की वाझे यांनी हे एकट्याने केले असेल हे शक्य नाही. त्यांच्या मागे मोठे पाठबळ असेल. क्राईम ब्रँच हे खंडणी वसुली केंद्र झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून याची न्यायालयान चौकशी व्हावी, असे मत मीरा बोरवणकर यांनी मांडले.

केरळचा आदर्श घ्यावा

सर्व राजकीय पक्षांनी मिळून पोलीस दलाची रया घालवली आहे. महाराष्ट्रात पोलिसींग पूर्ण संपले आहे, महाराष्ट्राने केरळ, तेलंगण या राज्यांकडून शिकायला हवे," असा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी आपला एक किस्साही सांगितला. पुण्यात असताना दोन एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला. त्यावेली आपल्यावरही आरोप झाल्याचे त्या म्हणाल्या.