मुंबई, ठाण्यानंतर पुण्यातही शाळा बंद

मुंबई, ठाण्यानंतर पुण्यातही शाळा बंद
file photo

मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद (schools)करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा (corona)आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार (ajit pawar)त्यांनी शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

file photo
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण, मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यानंतर आता पुण्यातीलही सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले की, दिवसेंदिवस कोरोनाची (school closed Omicron) परिस्थिती बिकट होत चालली आहे. या दृष्टीकोनातून राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना राबवत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात मी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एकूण परिस्थितीवर राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला याबाबतचे अधिकार देण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील इयत्ता 1ली ते 8वीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

file photo
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

"मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकलात तर 1000 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन्ही लस ज्याने घेतली नसेल तर कोणतीही हॉटेल, शासनाचे कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com