Saturday, April 27, 2024
Homeजळगावमधुकरनंतर आता वसंत साखर कारखान्यांचीही विक्री होणार

मधुकरनंतर आता वसंत साखर कारखान्यांचीही विक्री होणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एरंडोल (Erandole) तालुक्यातील कासोदा (Kasoda) येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या (Vasant Cooperative Sugar Factory) विक्रीला (sale) न्यायालयाने मंजुरी (Court approved) दिली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मंजूरी घेतल्यानंतर वसंत साखर कारखान्याची विक्री करण्यात येणार आहे.मधुकर सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ वसंत कारखान्याचीही विक्री होणार असल्याने जिल्हा बँक तोट्यातून बाहेर (Zilla Bank out of losses) पडणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील वसंत सहकारी कारखाना गेल्या 8 वर्षांपासून बंद असून, या कारखान्याकडे देखील जिल्हा बँकेची सुमारे 70 कोटींची थकबाकी होती. त्यामुळे जिल्हा बँकेने सिक्युटरायझेशन अ‍ॅक्ट अंतर्गत हा कारखाना देखील ताब्यात घेतला होता. राज्यातील काही साखर कारखाने विक्रीला न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यात कासोदा येथील वसंत कारखान्याचाही समावेश होता.

जिल्हा बँकेने नुकताच मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली आहे. ही प्रक्रिया राबवित असतांना जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी वसंत साखर कारखाना विक्रीला असलेल्या स्थगितीविरोधात न्यायालयात जिल्हा बँकेच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर कामकाज होऊन न्यायालयाने वसंत साखर कारखाना विक्रीवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना विक्रीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा बँकेकडून वसंत सहकारी साखर कारखान्याची तीन टप्प्यात विक्री करण्यात येणार आहे. या कारखान्याची एकूण जागा 265 एकर इतकी आहे.

पहिल्या टप्प्यात 100 एकर जमीन व कारखान्याची विक्री करण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 60 ते 70 एकर व तिसर्‍या टप्प्यात उर्वरीत जमीनीची विक्री करण्यात येणार आहे.

रेडीरेक्नरनुसार वसाकाच्या मालमत्तेचे मुल्यांकन काढून संचालक मंडळाच्या बैठकीत विक्रीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. संचालक मंडळाच्या मंजूरीनंतर निविदा प्रक्रिया राबवून वसाका विक्री केली जाईल. येत्या मार्च 2023 पर्यंत जिल्हा बँक नफ्यात आणण्याचा उद्देश आहे.

गुलाबराव देवकर, चेअरमन जिल्हा बँक.

- Advertisment -

ताज्या बातम्या