खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?

खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?

नाशिक

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पॉझिटिव्ह होणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. गेले काही आठवडे देशातील टॉप १० कोरोना रुग्ण असलेल्या शहरात नाशिकचा क्रमांक होता. राज्यात १४ एप्रिल ते १ मे या कालावधीसाठी लॉकडाऊन लावला. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दुसरा लॉकडाऊन १५ मे पर्यंत लागणार आहे. परंतु पहिल्या लॉकडाऊनचा काय फायदा झाला का? जाणून घेऊ या...

खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?
Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

वर्षभरात २३९२ तर २८ दिवसांत १०२७ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्च २०२० रोजी निफाडमध्ये सापडला होता. म्हणजेच २९ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत नाशिक जिल्ह्यात १ लाख ८१ हजार ५२२ रुग्ण सापडले आणि २३९२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात नाशिकमधील परिस्थिती बिकट झाली. गेल्या २८ दिवसांत (१ ते २८ एप्रिल) नाशिकमध्ये तब्बल १ लाख ३४ हजार ६८५ रुग्ण सापडले. तर १०२७ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच वर्षभरात २३९२ मृत्यू तर २८ दिवसांत १०२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?
1 मे पासून ट्रु जेटची नाशिक-अहमदाबाद विमान सेवा

लॉकडाऊनचा फायदा किती झाला?

नाशिकमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. सातत्याने ४ ते ६ हजार दरम्यान रूग्ण आढळत आहेत. लॉकडाऊन लागल्यापासून म्हणजेच १४ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीमध्ये नाशिक ७२ हजार ४०६ रुग्ण सापडले. रोजची सरासरी ५१५१ आहे. लॉकडाऊनच्या चौदा दिवसांमध्ये २७ आणि २८ एप्रिल या दोन दिवसांचा अपवाद वगळता रोज ४ हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहे. लॉकडाऊनपुर्वी अनेक वेळा तीन हजारांपेक्षा कमी रुग्ण सापडले होते.

लॉकडाऊनचा फायदा का नाही?

नाशिकमध्ये लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ किराणा दुकाने व भाजीमार्केट सुरु असते. या ठिकाणी सकाळच्या सत्रात मोठी गर्दी होत असते. माध्यमांनी अनेक वेळा त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करुनही त्यांची दखल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. सकाळी होणारी गर्दी रोखण्यास प्रशासनास अपयश आल्यामुळे कोरोनाचे आकडे मुंबईत कमी झाले तरी नाशिकमध्ये कमी होऊ शकले नाही.

नागरिकांचे दुर्लक्ष कारणीभूत?

कोरोनासाठी तीन सूत्र आहे. ते म्हणजे 3T (tracing, testing and treatment) आहे. प्रशासनाकडून या 3T चा वापर केला जात असला तरी नागरिकांची बेफिकरी कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात येऊ देत नाही. लॉकडाऊनमध्ये घरात थांबणे गरजेचे असतांना विनाकारण बाहेर फिरणारे कमी नाही. मास्कचा वापर होत असला तरी भाजी मार्केट व किराणा दुकानांवर सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नाही.

१४ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंतचे रोजचे कोरना रुग्ण

२८ एप्रिल - ४८६९

२७ एप्रिल- ३६६१

२६ एप्रिल -३६८३

२५ एप्रिल -५६७५

२४ एप्रिल -५९१८

२३ एप्रिल -४५६९

२२ एप्रिल -५९२८

२१एप्रिल -६५२७

२० एप्रिल -५००५

१९ एप्रिल -६८४५

१८ एप्रिल -५७४९

१७ एप्रिल -४७१८

१६ एप्रिल -४४३५

१५ एप्रिल -५९६७

१४ एप्रिल -६८२९

लॉकडाऊन पुर्वी म्हणजेच १३ एप्रिल ते १ एप्रिल रोजचे कोरोना रुग्ण

१३ एप्रिल -३३४३

१२ एप्रिल -३५८८

११ एप्रिल -३७४१

१० एप्रिल -४२९४

९ एप्रिल -३७२१

८ एप्रिल -६५०८

७ एप्रिल -४१२२

६ एप्रिल -४६३८

५ एप्रिल -४६१९

४ एप्रिल -४७७२

३ एप्रिल -४३३२

२ एप्रिल -३९९५

१ एप्रिल -३७८४

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com