अर्थसंकल्पानंतर पुन्हा शेअर निर्देशांक ५० हजारांवर

अर्थसंकल्पानंतर पुन्हा शेअर निर्देशांक ५० हजारांवर

नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही जोरदार स्वागत झाले आहे. मंगळवारीच सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स हजार अंकांनी वधारला असून निफ्टीनेही ३०० अंकांची झेप घेतली आहे.

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी ५९३ अंकांच्या उसळीसह ४९,१९३ अंकांवर सुरू झाला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये सतत तेजी बघायला मिळाली आणि सेन्सेक्सने ५० हजारांचा आकडाही ओलांडला. निफ्टीही अर्थसंकल्पाच्या दिवशी १४,२८१ अंकांवर बंद झाल्यानंतर आज २०० अंकांच्या तेजीसह ४९,४८१ अंकांवर सुरू झाला आणि १४,७०० अंकांपर्यंत पोहोचला. निफ्टीमध्येही दिवसाच्या सुरूवातीला तेजी बघायला मिळत आहे. सकाळी १० वाजता १४६२.८२ अंकासह निर्देशांक ५० हजार ६३ अंकांवर गेला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com