एअरटेल, व्होडाफोन-आयडियानंतर जिओकडून दरवाढ

jalgaon-digital
1 Min Read

एअरटेलनं प्रीपेड प्लान्सच्या (airtel plans)किमती वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आर्थिक संकटात सापडलेली व्होडाफोन-आयडियानेही (vodafone idea)दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून व्होडाफोन-आयडियाचे (vodafone idea plans)प्रीपेड प्लान्स महाग झाले. त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून व्होडाफोन-आयडिया प्रीपेड प्लान्सचे दर २५ टक्क्यांनी वाढले. आता जिओने (Reliance Jio)रीचार्ज प्लानचे दर वाढवले आहे. येत्या १ डिसेंबरपासून जिओचे प्रीपेड प्लान्सचे दर वाढणार आहे.

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

प्रती ग्राहक महसूल (एआरपीयू) वाढवण्याचा व्होडाफोन आयडियाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कंपनीनं २५ नोव्हेंबरपासून प्रीपेड प्लानचे दर २५ टक्क्यांनी वाढवले. कंपनीचे ११ मोबाईल फोन प्लान्स आणि चार डेटा पॅकेजेसचा दर जवळपास २० टक्क्यांनी वाढलेआहे. व्होडाफोन आयडियाच्या स्पर्धक कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ, एअरटेल नफ्यात आहेत. तर व्होडाफोन आयडिया तोट्यात आहे.

असे असतील नवीन दर
129 आता 155 होणार

399 आता 479 होणार

1,299 आता 1,559 होणार

2,399 आता 2,879 होणार

तसेच 6 GB डेटासाठी 51 ऐवजी 61 तर 12 GB साठी 101 ऐवजी 121 रुपए द्यावे लागणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *