२० वर्षानंतर राजकीय भेट : गुलाबराव पाटलांनी का घेतली खडसेंची भेट

२० वर्षानंतर राजकीय भेट : गुलाबराव पाटलांनी का घेतली खडसेंची भेट

कधी काळी राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक राजकारणात एकत्र येत असल्याचे दिसत आहे. जळगावचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil)आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse)यांची भेट झाली आहे. तब्बल २० वर्षांनी गुलाबराव खडसेंच्या घरी गेले.

२० वर्षानंतर राजकीय भेट : गुलाबराव पाटलांनी का घेतली खडसेंची भेट
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

जळगाव (jalgaon)जिल्ह्यात भाजप-शिवसेना (bjp-shiv sena)युती असतांनाही गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे यांच्यात राजकीय वैर होते. त्यानंतर खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि सध्या बँकेवर खडसेंचे वर्चस्व आहे. यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गुलाबरावांनी खडसेंचे मुंबईतील घर गाठले. जिल्हा बँक (jdcc) निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. यासाठीच आपण गेल्या २० वर्षात प्रथमच एकनाथराव खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गेलो होतो, असे गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश ९ ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com