Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदीड वर्षानंतर कॉलेज गजबजले, कॅन्टीनमध्ये गर्दी

दीड वर्षानंतर कॉलेज गजबजले, कॅन्टीनमध्ये गर्दी

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालय (College) आजपासून करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिकमधील कॉलेज गजबजली. केटीएचएम, एचपीटी, बीवायके, आरवायके आदी कॉलेजेस विद्यार्थ्यांनी फुलली होती. दीड वर्षानंतर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पाऊल ठेवले.

विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला कट्टा म्हणजेच कॉलेज कँन्टीनमध्ये गर्दी झाली. अनेक महिन्यांनी जुने मित्र प्रत्यक्षात भेटत असल्यामुळे गप्पांचा फडही रंगला होता.

- Advertisement -

कँन्टीनप्रमाणे गाऊंडवरही विद्यार्थी, विद्यार्थीनी दिसत होते. ऑनलाईन शिक्षणाचा अनुभवावर त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी बसवण्यात आला होता.

बुधवारी महाविद्यालये सुरु होणार असल्यामुळे मंगळवारी नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये तयारी करण्यात आली. महाविद्यालयतील वर्ग खोल्या व मैदानांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिन्स्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असेल. ५० टक्के क्षमतेसह सुरुवातीला ऑफलाइन शिक्षण सुरू होईल.

18 वर्षावरील ज्या विद्यार्थी व विद्यार्थींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी व विद्यार्थींनी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

वर्ग सुरू करतांना स्थानिक प्रशासनाशी विचारविनियम करून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना विद्यापीठांना केल्या आहेत.

महाविद्यालये, परिसंस्था व प्रशाळा सुरू करताना 50 टक्के किंवा त्या पेक्षा जास्त क्षमतेने सुरु करताना कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेण्यात याव्यात

महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेची पुर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडाली होती. त्यासाठी मोठी रांग लागली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या