मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठे यश, तहव्वूर राणाला देशात आणण्याचा मार्ग मोकळा

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठे यश, तहव्वूर राणाला देशात आणण्याचा मार्ग मोकळा

मुंबई | Mumbai

कॅलिफोर्निया येथील अमेरिकेतील न्यायालयाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे सुपूर्द करण्यास परवानगी दिली आहे...

भारताने 10 जून 2020 रोजी तहव्वूर राणाला (62) प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची तक्रार दाखल केली. अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यतादेखील दिली. भारताला हे मोठे यश मिळाले आहे.

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. गेले काही दिवस याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कार्यवाही सुरु केली होती.

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठे यश, तहव्वूर राणाला देशात आणण्याचा मार्ग मोकळा
"एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर..." संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर खोचक टीका

अमेरिकेच्या न्यायालयाने अलीकडेच राणा यांच्या अभियोगासोबत झालेल्या भेटीबाबतची स्टेटस कॉन्फरन्स नाकारली होती. मात्र, आता अमेरिकन न्यायालयाने भारताच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.

16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितले की, भारताने सुनावणीच्या वेळी सादर केलेल्या युक्तिवादांमध्ये आणि सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठे यश, तहव्वूर राणाला देशात आणण्याचा मार्ग मोकळा
Live Updates : कायदेमंत्रीपदावरून किरेन रिजिजू यांना हटवले; आता ‘या’ नेत्याकडे कार्यभार

ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे. त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय तहव्वूर राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले.

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठे यश, तहव्वूर राणाला देशात आणण्याचा मार्ग मोकळा
पुन्हा भिर्रर्र! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com