Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रनॉट रिचेबल असलेले संजय राठोड १५ दिवसांनी आले समोर

नॉट रिचेबल असलेले संजय राठोड १५ दिवसांनी आले समोर

यवतमाळ

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड अखेर मंगळवारी यवतमाळमध्ये प्रसारमाध्यमांसमोर आले. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले होते. पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यांसोबत १६ गाड्यांचा ताफा आहे.

- Advertisement -

संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. संजय राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले असून तिथे गेल्यानंतर ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतके दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे.

काय आहे प्रकरण

मुळची परळीची असणाऱ्या पूजा चव्हाणे पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. पूजा चव्हाण शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या