पेट्रोलपंप संघटनेला सबुरीचा सल्ला

पेट्रोलपंप संघटनेला सबुरीचा सल्ला

आयुक्तांशी चर्चा करू भुजबळांचे आश्वासन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस आयक्तांनी ( Commissioner Of Police ) काढलेल्या अध्यादेशाविरोधात जिल्हाभरातील पेट्रोलपंप संघटना (Petrol Pump Association )पदाधिकारी व सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन व्यथा मांडली. यावेळी भुजबळ यांनी पेट्रोल पंपचालकांना सबुरीचा सल्ला देताना पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.

पोलीस आयुक्तांनी शहरातील पेट्रोलपंपचालकांना हेल्मेटशिवाय ( Helmet )पेट्रोल दिल्यास त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल का करू नये? अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पेट्रोलपंपचालक संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला.

पालकमंत्री भुजबळ यांनी परिस्थिती समजून घेतली. गुढीपाडव्याच्या ( Gudhipadva Festival )दिवशी नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून पेट्रोलपंप बंद न ठेवण्याची सूचना व्यवसायिकांना केली. हा प्रश्न आयुक्तांशी संबंधित असल्याने आपण तातडीने संवाद साधून चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

बंदवर संघटना ठाम

पालकमंत्री भुजबळ यांनी पेट्रोलपंपचालक संघटनेला पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर संघटना सभासदांची पुन्हा बैठक झाली. नाशिक आयुक्तालय हद्दीतील सर्व सरकारी व खासगी कंपन्यांचे पेट्रोलपंप 2 एप्रिलला डिझेल, पेट्रोल, सीएनजी, ऑईल, एलपीजी यांची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाशिक पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले. नाशिक शहरात असलेले ऑईल कंपन्यांचे स्वतःचे आऊटलेट तसेच पोलिसांच्या अखत्यारीतील दोन पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवांना इंधन पुरवतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com