अद्वय हिरे यांची उद्धव ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती

अद्वय हिरे यांची उद्धव ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अद्वय प्रशांत हिरे यांची आज मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे आज खा. विनायक राऊत यांनी उपनेतेपदी हिरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.

मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची अद्वय हिरे यांनी भेट घेत येत्या 26 मार्च रोजी मसगा मैदानावर आयोजित विराट सभेचे आमंत्रण दिले यावेळी उपनेते पदी निवड झालेल्या हिरे यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

या प्रसंगी . खा. संजय राऊत, . खा. विनायक राऊत, माजी मंत्री, आ. सुभाष देसाई, विरोधीपक्ष नेते, अंबादास दानवे, आ. भास्करराव जाधव,संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहनेते सुनील बागुल, .सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे, लकी खैरनार आदि मान्यवर उपस्थित होते.

मालेगांवी रविवार २६ मार्च रोजी म.स.गा. महाविद्यालयाच्या प्रांगणावर विराट महासभा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जनेने संपन्न होणार आहे, या सभेस सेना नेते प्रमुख नेत्यांसह ठाकरे गटाचे महाराष्ट्रातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

या शिवगर्जना प्रचंड महामेळाव्याच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच श्री क्षेत्र चंदनपुरी येथे महाराष्ट्राचे आराध्य कुल दैवत खंडोबा महाराज मंदिरात खोबरे, भंडाऱ्याची उधळण करत श्रीफळ वाढवून जल्लोषात करण्यात आला, मालेगांव तालुक्यात या साठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com