Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या५० गद्दारांमुळे आमची गरज संपली; अद्वय हिरेंचे भाजपवर टीकास्त्र

५० गद्दारांमुळे आमची गरज संपली; अद्वय हिरेंचे भाजपवर टीकास्त्र

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

आम्ही असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षात चांगल्या पदावर बसवले. पण ५० लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे पक्षाला काय झाले, हेच कळत नाही. पक्षाला आता आमची गरज राहिली नाही, अशा शब्दात अद्वय हिरे (Dr.Advay Hiray) यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले….

- Advertisement -

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी हिरे म्हणाले की, मी व्यक्तिगत पदासाठी भाजपकडे मागणी केलेली नव्हती. माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या (suicide) केल्या. त्यावेळी जनआंदोलनात मी रस्त्यावर उतरलो. पक्षाकडे न्याय मागितला, पण पक्षाने शेतकऱ्याला मरू दिले. जो पक्ष शेतकऱ्याला वाचवू शकत नाही, त्याच्या नेतृत्वात मी काम करणार नाही. त्यामुळे मी भाजपचा त्याग केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, आज मला प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले. त्यांना स्पष्टपणे सांगितले की कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना सोडून लोक निघून जात आहेत, हा गैरसमज आहे. जे गद्दार गेले आहेत, त्यांना जनता धडा शिकवणार आहे. मी आता भाजपमधून बाहेर पडलोय, पण ४९ मतदारसंघात भाजपाचे नेते थांबले आहेत, ज्यांची कुचंबणा होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करतील, असा दावा हिरे यांनी केला.

तसेच २००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची धुळे लोकसभेची (Dhule Lok Sabha) जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपबरोबर काम करत आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत तत्कालीन मंत्र्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव करून भाजपचा उमेदवार निवडून आणला होता. सरपंच, जिल्हा परिषदमध्ये भाजपची सत्ता आणली होती. अशी माहितीही हिरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या