जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांवर प्रशासक?

जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांवर प्रशासक?
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रात करोनाचा corona प्रादुर्भाव वाढत असल्याने सार्वत्रिक निवडणुका elections घेणे सध्या शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ Term of Local Bodies Government Institutions संपुष्टात येताच अशा नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, येवला, भगूर, नांदगाव व सटाणा नगरपरिषदांवर प्रशासकराज Administrator rule over Town Councils येण्याची शक्यता आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून लवकरच निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरील सहाही नगरपरिषदांची मुदत 29 डिसेंबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची लगबग सुरू झाली होती. मात्र राज्यात करोनाचा व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

यामुळे निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपालिकांचा सार्वत्रिक निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलला आहे. म्हणून या नगरपालिकांचा कार्यकाळ संपताच या ठिकाणी प्रशासन नियुक्तीचे आदेश आयोगाने

दले. त्यानुसार मनमाड, नांदगाव नगरपरिषदेवर मुख्याधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे तर सिन्नर, येवला, भगूर, सटाणा नगरपरिषदेवर उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील 23 नगरपरिषदांवर प्रशासन नियुक्तीचे आदेश देण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com