जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘प्रशासकमुक्त’

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘प्रशासकमुक्त’

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष तथा सहायक आयुक्त मोहम्मद आरिफ (Mohammed Arif) यांनी प्रशासकपदाचा तडकाफडकी राजीनामा (resignation) दिला. वैयक्तिक कारणास्तव साखर आयुक्तांकडे आरिफ यांनी आपला राजीनामा सुपुर्द केल्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता ‘प्रशासकमुक्त’ झाली आहे...

प्रशासकीय मंडळाचे सदस्य असलेल्या चंद्रशेखर बारी यांनी आरिफ यांच्यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) जिल्हा बँकेचे संचालक मंडळ डिसेंबर २०१७ मध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरकारभाराचा ठपका ठेवत बरखास्त केले आहे.

राज्य शासनाने दि. २२ मार्चला तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश दिले. मुंबई व उपनगरे, पूर्व ते पश्चिम एसआरए सहकारी संस्थांचे सहायक आयुक्त मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखालील या प्रशासक मंडळात सहकारी संस्थांचे उपनिबंधक चंद्रशेखर बारी तसेच सनदी लेखापाल तुषार पगार यांचाही सदस्य म्हणून समावेश होता.

परंतु, तुषार पगार यांनी बँकेचा हा काटेरी मुकुट स्विकारलाच नाही. त्यामुळे आरिफ व बारी यांनीच बँकेचा कारभार हाती घेतला. त्यातही चंद्रशेखर बारी यांनी काही महिन्यांपूर्विच राजीनामा दिल्याने आरिफ हे एकटे प्रशासक म्हणून काम करत होते. परंतु, त्यांनी वैयक्तिक कारणास्तव साखर आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपुर्द केल्याने बँक आता ‘प्रशासकमुक्त’ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com