महापौर बंगला 'रामायण' ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग

रामायण बंगला |Ramayan Bangla
रामायण बंगला |Ramayan Bangla रामायण बंगला |Ramayan Bangla

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik NMC) प्रशासन निवडणूकीच्या (Election) कामामध्ये गुंतल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने (State Government) दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधेयकाबाबत स्थानिक प्रशासनाला विशेष आदेश आले नसल्याने नियमितपणे काम सुरू आहे....

दरम्यान 15 मार्चपासून महापालिकेत प्रशासक राज्य सुरू होणार असल्याने महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामायण (Ramayan) ताब्यात घेण्याची तयारी प्रशासनाकडून (Government) सुरू झाली आहे.

दुसरीकडे निवडणूक वेळेवर होणार की आणखी लांबणार यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसत आहे. नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका यंदा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडल्या आहेत. आधी करोना (Corona) आणि नंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द झाल्याने निवडणूक लांबणीवर पडणार, हे निश्चितच झालेले आहे.

नाशिक महापालिकेच्या आतापर्यंतच्या एकूण सहा पंचवार्षिक निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. मात्र, अशा प्रकारे अनिश्चिततेची ही पहिलीच वेळ आहे. २०१७ मध्ये महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी ७ जानेवारी राेजी निवडणूक घोषित झाली होती. तसेच २४ फेब्रुवारीस मतदान झाले आणि १४ मार्च रोजी महापौरपदाची निवडणूक झाली होती.

तर 2022 च्या निवडणुकीसंदर्भात विचार केला तर अद्याप प्रभागरचनादेखील (Ward Structure) अंतिम स्वरूपात जाहीर झाले नाही. आरक्षणदेखील (Reservation) पडलेले नाही, तर दुसरीकडे राज्य शासनाने महापौर कार्यकाळ संपत आल्याने 15 मार्चपासून नाशिक महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) हेच सांभाळतील असा आदेश काढला आहे.

या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होताना दिसत आहे. महापालिकेतील अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन निर्वाचित झालेल्या नगरसेवकांची पहिली सभा ज्या दिवशी होते, त्या दिवसापासून पाच वर्षे गृहीत धरले जातात.

त्यानुसार सध्याच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपेल. याबाबतची कल्पना नगरसचिवांकडून महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांना दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ मार्च रेाजी सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालये सील करण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com