गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे : भुजबळ

गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे : भुजबळ

येवला | प्रतिनिधी |Yeola

दोन दिवसात गणेश उत्सवात (Ganesh festival) सुरुवात होणार असून हा गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागानी सामूहिक नियोजन करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former DCM Chhagan Bhujbal) यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत...

भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज येवला (Yeola)येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गणेश उत्सव कालावधीत काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे खड्डे (Road potholes)तात्काळ बुजविण्यात यावे. अहिल्याबाई होळकर घाट (Ahilyabai Holkar Ghat) व इतर विसर्जनस्थळी साफसफाईची तसेच लाईटची,साऊंड सिस्टीमची कामे करण्यात यावी.

याठिकाणी कुठलीही दुर्घटना होणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा तसेच पूर्णवेळ लाईफ सेव्हींग गार्डची नेमणूक करण्यात येऊन कुठलाही अपघात न होता हा उत्सव निर्विघ्न पार कसा पडेल त्यादृष्टीने नियोजन करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी तहसीलदार प्रमोद हिले (Tehsildar Pramod Hille) नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर (Nagendra Mutkekar) कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उमेश पाटील, उपअभियंता कुलकर्णी, गटविकास अधिकारी अन्सार शेख, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैदयकिय अधिक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,शहराध्यक्ष दीपक लोणारी,पोलीस अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

येवला तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील नुकसानग्रस्त भागातील काही ठिकाणी अद्यापही पंचनामे झालेले नाही अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त कुणीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

भुजबळ यांच्याकडून येवल्यातील अहिल्यादेवी घाटाची पाहणी

बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी येवल्यातील अहिल्यादेवी होळकर घाटाची पाहणी केली.गणेशोत्सवात येवला शहरातील घरगुती व मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन अहिल्यादेवी होळकर घाट येथे करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी घाटावर प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी याठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण,लाईटची व्यवस्था ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com