ठरलं! आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर

ठरलं! आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर

मुंबई | Mumbai

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) १० जूनला अयोध्या (Ayodhya) दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे...

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्यावरून टीका केली आहे. अयोध्येत नकली भावनेतून जाणाऱ्यांना रामलल्लाचा आशीर्वाद मिळत नाही, त्यांना विरोध होणार, असे त्यांनी म्हटले आहे.

ठरलं! आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर
मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; नवनीत राणांचे थेट आव्हान

ते पुढे म्हणाले की, प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. उत्तर प्रदेशात असली-नकली बनार कोणी लावले माहित नाही. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दौऱ्यासाठी १० जूनची तारीख ठरत आहे.

ठरलं! आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर
संजय राऊत चवन्नी छाप माणूस; काय म्हणाले रवी राणा?

त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार, आणि शिवसेना, युवसेनेचे कार्यकर्तेही अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. या दौऱ्यानिमित्त अयोध्येत (Ayodhya) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे.

Related Stories

No stories found.