Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याSheetal Mhatre Video : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

Sheetal Mhatre Video : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल होत आहे…

- Advertisement -

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील ‘मातोश्री’ नावाच्या पेजबाबत तक्रार केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे.

आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय साईनाथ दुर्गे (Sainath Durve) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. साईनाथ दुर्गे यांना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

शीतल म्हात्रेंच्या ‘त्या’ Video वरुन महिला आमदार भडकल्या, विधानसभेत गोंधळ

साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतल्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आज विधीमंडळात देखील हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष दलाने त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिंदे शिवारात बिबट्या जेरबंद

दरम्यान, साईनाथ दुर्गे (Sainath Durve) हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. साईनाथ दुर्गे युवासेना सदस्य आहेत. शिवसेना युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी साईनाथ दुर्गे यांच्यावर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या