Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य मास्कमुक्त होणार? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

राज्य मास्कमुक्त होणार? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या (Corona Patients) संख्येत घट होत आहे. लसीकरणाचा (Vaccination) वेगदेखील वाढला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता मास्क (Mask) सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत महत्वाचे विधान केले आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, मास्कपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज आहे. आपण हा गैरसमज काढून टाकला पाहिजे की मास्कची सक्ती हटवण्यात येईल. आतापर्यंत जे काही निर्णय घेतले ते सगळे डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेण्यात आले.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोनाची (Corona) साथ संपली आहे असे अद्याप जाहीर केलेले नाही. ओमायक्रॉनचा (Omicrona) कोणताही व्हेरिएंट हा सौम्य किंवा गंभीर आहे असेदेखील सांगितले नाही. कारण व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. मी एकच सांगू शकेन की जर आपल्याला स्वत:ला वाचवायचे असेल, तर आत्तापर्यंतचे सर्वात चांगले शस्त्र हे मास्क आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

दरम्यान, करोना निर्बंधांबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीदेखील मास्कविषयी सूतोवाच केले होते. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांमध्ये, अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, निर्बंध कमी केले आहेत.

मात्र भारताचा विचार केला तर करोनासोबत जगण्यासाठी आता नवी नियमावली बनवायला हवी, अशी अपेक्षा राजेश टोपेंनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मास्कविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

- Advertisment -

ताज्या बातम्या