Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला

आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला

मुंबई । Mumbai

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (shivsena) काही आमदारांसह (mla) बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेनेकडून राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच राज्याचे पर्यावरण मंत्री (State Environment Minister) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या ट्विटर (Twitter) हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असे ठेवले आहे. या अगोदर आदित्य ठाकरेंच्या ट्विटर प्रोफाईलवर पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री असा मंत्रिपदाचा उल्लेख होता. परंतु आता आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून हे सर्व हटवल्यामुळे ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता कॅबिनेटची बैठक घेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या