आता शिवसैनिकांना काय उत्तर देणार?; आदित्य ठाकरे कडाडले

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी बहुमत चाचणीसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते.

त्यानंतर आजपासून हे अधिवेशन सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (BJP MLA Rahul Narvekar) विजयी झाल्याने शिंदे सरकारने विधीमंडळातली पहिली लढाई जिंकली आहे. त्यानंतर शिवसेनेचे (shivsena) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) निशाणा साधला आहे…

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, बंडखोर आमदारांनी आज आमच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही ते आमदार आता मतदारसंघातील शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहेत, कधीपर्यंत बसमधून प्रवास करणार, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

तसेच बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात मतदान केल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांनी तो व्हीप मान्य केला असून आज ते आमदार मोरॅलिटी टोस्टमध्ये फेल झाले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांवर जो कोट्यवधींचा खर्च केला गेला त्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. बंडखोरांना सूरत (surat) गुवाहाटी (Guwahati) व्हाया गोव्याला (goa) नेण्यासाठी आणि इथे आणण्यासाठी जो खर्च झाला. तो कुठून आला असेल बरं? असे म्हणत आदित्य ठाकरेंनी खोचक टोला बंडखोरांना लगावला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *