Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : 'आदित्य एल १' ने काढला पहिला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही...

Video : ‘आदित्य एल १’ ने काढला पहिला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही पाठवले फोटो

नवी दिल्ली | New Delhi

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ (Aditya L1) उपग्रहाची पृथ्वीच्या (Earth) कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर आता आदित्य एल १ उपग्रहाने पहिला सेल्फी इस्रोला (ISRO) पाठवला आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या १२५ दिवसांच्या प्रवासातील हा पहिलाच फोटो असून आदित्यने पाठवलेल्या सेल्फीमधून पृथ्वी व चंद्राचे फोटो पाहायला मिळत आहेत…

- Advertisement -

Dahihandi 2023 : राज्यभरात दहीहंडीचा उत्साह; मुंबई, ठाण्यात रंगणार थरांचा थरार

इस्रो’ने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरून हा सुंदर क्षण जगाबरोबर शेअर केला आहे. यामध्ये आदित्य उपग्रहाने (Aditya Satellite) काढलेला सेल्फी व्हिडिओ आणि पृथ्वी आणि चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे. आदित्य उपग्रहावरील VELC आणि SUIT हे पेलोड देखील या सेल्फीमध्ये दिसत आहेत. ०४ सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ टिपण्यात आला होता, असेही यात म्हटले आहे.

Maratha Andolan : “सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण…”; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

आदित्य एल १ ची कक्षा बदलाचा दुसरा टप्पा ५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता पार पडला. याआधी पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन १) बंगळुरूच्या ‘आयएसटीआरएसी’ येथून यशस्वीरित्या पार पडली होती. शनिवारी २ सप्टेंबरला आदित्य एल- १ चे आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते.

पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या (Sun) दिशेने हे यान १२५ दिवसांनी पोहोचणार आहे. हे अंतर पृथ्वी-सूर्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्केच असले तरीही ‘एल-१’ हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो. अवघ्या ४०० कोटींच्या बजेटमध्ये सौर मोहीम राबवणारा भारत (India) हा पहिला देश ठरला आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी; गुन्हा दाखल

दरम्यान, सध्या आदित्य एल- १ उपग्रह हा पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत तो पृथ्वीभोवती फेरी मारेल. यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून तो एल-१ पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल-१ हा अंतराळातील असा पॉइंट आहे, ज्याठिकाणी पृथ्वी किंवा सूर्याचे गुरुत्वाकर्षण जाणवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेली वस्तू स्थिर राहते. यामुळेच या पॉइंटची निवड करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मानव केंद्रित जागतिकीकरण : शेवटच्या घटकापर्यंत जी 20 नेताना कोणालाही मागे राहू देणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisment -

ताज्या बातम्या