Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याहोळीनिमित्त कोकणासाठी 'इतक्या' जादा बसेस

होळीनिमित्त कोकणासाठी ‘इतक्या’ जादा बसेस

मुंबई | Mumbai

कोकणातील (Konkan) काही प्रमुख सणांपैकी होळी हा एक महत्वाचा सण मानला जातो, कोकणवासीयांच्या संस्कृतीचा (Culture) भाग म्हणून होळीला विशेष महत्व दिले जाते. गणेशोत्सव (Ganeshotsav) आणि होळी (Holi) या उत्सवाला चाकरमानी आपल्या मूळ गावाकडे धाव घेतात. याचा विचार करून, होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे…

- Advertisement -

“आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”; थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

दि. ०३ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Managing Director Shekhar Channe) यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने (corporations) यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Turkey and Syria Earthquake : तुर्की-सीरियातील विध्वंसाने किल्लारीच्या ‘त्‍या’ कटू आठवणी पुन्हा ताज्या

मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून  खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण  आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या