Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादैवानं दिलं आणि कर्माने नेलं : अतिक्रमण उपसरपंचाला भोवलं

दैवानं दिलं आणि कर्माने नेलं : अतिक्रमण उपसरपंचाला भोवलं

नाशिक | Nashik

जलसंपदाच्या कॅनॉलवरून (Irrigation Canal) विना – परवाना पाईपलाईन (pipeline without permission) टाकली म्हणून उपसरपंचाला आपले पद सोडावे लागले आहे. दैवानं दिलं पण कर्माने नेलं या शब्दांत ग्रामस्थ आता पारावर त्याबाबत खमंग चर्चा करत आहेत….

- Advertisement -

अतिक्रमणामुळे (Encroachment) अनेक सरपंचांची पदे (Sarpanch) गेल्याचे अनेकदा ऐकण्यात येते. परंतू, कॅनॉलवर (Canal) विनापरवाना पाईपलाईन टाकून कॅनाल ओलांडला म्हणून नाशिक जिल्हयातील येवला तालुक्यातील निमगाव मढ (Nimgaon Madh Tal Yeola) येथील नितीन लभडे या उपसरपंचाचे पद अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Addt Collector Dattaprasad Nade) यांनी यांनी रद्द केले आहे.

निमगाव गढ (Nimgaon Madh) येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे हितचिंतक नवनाथ लभडे यांनी उपसरपंचाचे पद घालवून त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. एका लहानशा चुकीमुळे थेट उपसरपंचपदालाच मुकावे लागल्यामुळे लोकप्रतिनिधींना चांगलीच चपराक बसली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरत असताना काहीही करू शकतो हा गैरसमज यातुन दुर होण्यास मदत झाली आहे. पद मिळाले की अनेकांकडून पदाचा दुरूपयोग करण्याला सुरुवात होते. पद आहे म्हणून कोणी जवळपास फिरकत नाही. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींची मुजोरी अधिकच वाढत असते.

परंतु, कायद्यापुढे सर्व समान असते याची प्रचिती या लोकप्रतिनिधीला मात्र आज यानिमित्ताने आली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने बेकायदेशीर काम केल्याने त्याचे पद जाऊ शकते ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. नवनाथ लभडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर समोर स्वतः युक्तीवाद केला. नांदुरमध्यमेश्वर येथुन जाणा़र्‍या पाटावर नितीन लभडे व सुभाष लभडे यांनी कशी पाईप लाईन टाकली.

कसे अतिक्रमण केले? पदाचा कसा दुरुपयोग केला गेला? हे पटवून देण्यात आले आहे. अ‍ॅड एस. जी. गाढे यांनी काम पाहीले.

- Advertisment -

ताज्या बातम्या