'या' दोन बड्या दिग्गजांनी लस टोचून घेत नागरिकांची मने जिंकली

'या' दोन बड्या दिग्गजांनी लस टोचून घेत नागरिकांची मने जिंकली

मुंबई |प्रतनिधी

देशात करोना लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी सीरमचे संचालक अदर पुनावाला आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींनी करोना लस आज घेतली...

बड्या व्यक्तींनी लस टोचून घेत इतरांनाही प्रोत्साहित केले आहे. लसीकरणात सर्व करोना योद्ध्यांना साथ म्हणून लस घेतल्याचे पूनावाला म्हणाले. करोना लस संपूर्ण सुरक्षित असल्याचेदेखील ते म्हणाले.

आज सकाळपासून लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी दिल्ली आणि एम्सच्या माजी संचालक डॉ. अशोक महापात्रा यांनी भुवनेश्वरमध्ये स्वदेशी कोरोना व्हॅक्सिन टोचून घेतली.

कोविक्सीनचा डोस घेतल्यानंतर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, करोना व्हॅक्सिनबाबत कोणतीही समस्या नाही, सर्व लोकांनी व्हॅक्सिन घेण्याची गरज आहे. करोना लसीमध्ये कोणतीही अडचण नाही, प्रत्येकाने ही लस घ्यावी असे गुलेरिया म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com