अभिनेत्री राखी सावंतला अटक

अभिनेत्री राखी सावंतला अटक

मुंबई | Mumbai

अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) आंबोली पोलिसांनी (Amboli Police) अटक (Arrested) केल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे...

आज दुपारी 3 वाजता राखी सावंत तिचा पती आदिलसोबत तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक केली आहे.

शर्लिन चोप्राने ट्विटरवर ट्वीट करत म्हटले आहे की, ताजी बातमी!!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.

नोव्हेंबर 2022 मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती आणि तिने पत्रकार परिषदेत तिचा अश्लील व्हिडिओ दाखवताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com