Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार

Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार

नवी दिल्ली | New Delhi

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel and Palestine) सुरू असलेल्या युद्धाने (War) गंभीर स्वरुप धारण केले असून या संघर्षामध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर हमासच्या हल्ल्यात (Attack) ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात २३० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात सुमारे १५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार
Israel-Palestine War : इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो जखमी

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धामुळे अनेक भारतीयांचा जीव वेठीस लागला आहे. कारण बरेच भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकून पडले असून त्याचा फटका बॉलिवूड सेलिब्रेटींना देखील बसला आहे. भारतातील बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha)ही इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती सकाळी समोर आली होती. अभिनेत्री अडकल्याची बातमी मिळताच अनेक सेलिब्रिटी मित्रांसह तिचे चाहते देखील अस्वस्थ झाले होते.

Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरले; २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, अनेक इमारती जमीनदोस्त

त्यानंतर आता अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली असून ती लवकरच भारतात (India) परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत तिच्या टीमने संपर्क केला असून ती परदेशामध्ये सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. तसेच भारतात येण्यासाठी ती विमानतळावर पोहोचल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे काही तासांतच अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतणार आहे.

Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार
Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

दरम्यान, काल दुपारपासून अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा संपर्क होत नव्हता. त्यानंतर तिच्या टीमने माध्यमांना माहिती देतांना सांगितले होते की, नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. तसेच तिच्याशी काल (शनिवार) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. ज्यावेळी संपर्क झाला तेव्हा ती एका तळघरात होती आणि सुरक्षित होती. त्यानंतर मात्र तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नव्हता. त्यानंतर आता अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरूप असल्याची माहिती मिळाली असून लवकरच ती भारतात परतणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार
Israel Palestine Conflict : इस्रायलमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री अडकली, संपर्कही तुटला
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com