Israel Palestine War : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली

Israel Palestine War : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली

मुंबई | Mumbai

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel and Palestine) युद्धाचा भडका उडाला असून दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे १५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकून पडले आहेत. त्याचा फटका बॉलिवूड सेलिब्रेटींना देखील बसला असून भारतातील बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) नुसरत भरुचा ही इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती सकाळी समोर आली होती. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींसह तिचे चाहते देखील अस्वस्थ झाले होते.

Israel Palestine War : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली
Israel Palestine War : इस्रायलमधील युद्धात 'नॉट रिचेबल' झालेली अभिनेत्री सुखरुप; लवकरच भारतात परतणार

अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) ही इस्त्रालयमध्ये हाइफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली होती. आपला आगामी चित्रपट 'अकेली'च्या स्क्रिनिंगसाठी नुसरत फिल्म फेस्टिव्हलमध्य सहभागी झाली होती. यावेळी युद्ध सुरु झाल्यानतंर नुसरतचा कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात होती. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. तिच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नव्हता.

त्यानंतर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत तिच्या टीमने संपर्क केला असता ती एका ठिकाणी बेसमेंटमध्ये सुरक्षित असल्याचे कळले होते. यानंतर तिला लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले होते. त्यानंतर अखेर या प्रयत्नांना यश आले असून इस्त्रायलमधून भारतासाठी थेट विमान नसल्याने कनेक्टिंग फ्लाईटने अभिनेत्री नुसरत भरुचा आज दुपारी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सुखरुप पोहोचली आहे.

Israel Palestine War : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली
MLA Bharat Gogawale : "सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेऊ नये हे आमचं आणि भाजपच्या आमदारांचं..."; भरत गोगावले स्पष्टच बोलले

दरम्यान, यावेळी माध्यमांनी अभिनेत्री नुसरत भरुचा हिला प्रश्न विचारला असता आता आपली तब्येत ठिक नाही, मला आरामाची गरज असल्याचे सांगत लवकरच माध्यमांशी सविस्तर बोलू असे म्हटले. अभिनेत्री नुसरत भरुचा ही सुखरूप भारतात (India) आल्याने तिच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Israel Palestine War : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली
Israel Palestine Conflict : इस्रायलमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री अडकली, संपर्कही तुटला

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com