
मुंबई | Mumbai
अभिनेत्री दिपाली सय्यदने (Actress Deepali Sayyed) तिच्या बदनामी प्रकरणी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे याच्या विरुद्ध ओशिवारा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत स्वीय सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) याने अभिनेत्री दिपाली सय्यद हिचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप करत तिचा अंडर्वल्डशी संबंध असून दुबई व लंडनमध्ये मालमत्ता असल्याचे म्हटले होते.
दिपाली सय्यद हिच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज शिंदे २०१९ पर्यंत पाहत होता. मात्र, सय्यद हिने शिंदे याला २०१९ मध्ये कामावरुन काढून टाकल्याने त्याच्यात आणि दीपाली सय्यदमध्ये बिनसले होते. त्यानंतर आज दिपाली सय्यद हिने बदनामी केल्याप्रकरणी (Case of Defamation) ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, भाऊसाहेब शिंदे याने अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेत दिपाली सय्यद हिचा पाकिस्तान, दाऊदशी संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच दिपाली सय्यद हिने सामुदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोप देखील शिंदे याने केला होता.