‘चांद्रयान-३’ मिशनची खिल्ली उडवल्याने साऊथ अभिनेता प्रकाश राज ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

‘चांद्रयान-३’ मिशनची खिल्ली उडवल्याने साऊथ अभिनेता प्रकाश राज ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

मुंबई | Mumbai

संपूर्ण भारत सध्या २३ ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहे. याचे कारण म्हणजे याच दिवशी दुपारी चांद्रयान-३ चंद्राच्या (Chandrayaan-3) पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. ISRO च्या या मोहिमेकडे फक्त भारतीय नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. पण यादरम्यान अभिनेते प्रकाश राज (Actor PrakashRaj) यांनी चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. प्रकाश राज यांनी भाजपावर टीका करताना चांद्रयान-३ ची खिल्ली उडवणे नेटकऱ्यांना रुचलेले नाही.

रविवारी त्यांनी एक ट्विट केले असल्याने नेटकरी त्यांच्यावर खूप नाराज झाले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी इस्रोच्या चांद्रयान-३ मिशनची खिल्ली उडवल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. शर्ट आणि लुंग घातलेल्या एका व्यक्तीचे कॅरिकेचर त्यांनी शेअर केले असून या व्यक्तीच्या हातात दोन कप असून तो एका कपमधून दुसऱ्या कपमध्ये चहा ओततोय. या फोटोसोबत प्रकाश राज यांनी लिहिले, ‘ब्रेकिंग न्यूज- चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो.. वॉव!’ हे ट्विट पाहून नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. सत्ताधारी पक्षाला राजकीय टोले लगावताना इस्रोला बाजूला ठेवावे, असा सल्ला थेट नेटकऱ्यांनी त्यांना दिला आहे.

‘चांद्रयान-३’ मिशनची खिल्ली उडवल्याने साऊथ अभिनेता प्रकाश राज ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार
अनिल देशमुखांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, ''मी समझोता करायला...''

यानंतर नेटकरी संतापले असून, प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील हा अंध द्वेष असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. प्रकाश राज यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून, चहावाला अशा शब्दांत खिल्ली उडवली आहे.

एका युजरने म्ंहटले आहे, इस्रो गौरवशाली भारताचे प्रतिनिधित्व करते. तुटपुंजे संसाधने आणि निराशावादी वातावरण असतानाही अनेक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. काही मोजक्याच देशांनी साध्य केले ते इस्त्रोने मिळवून दाखवले आहे. आता जगातील काही मोजक्या संस्थामध्ये इस्रोचाही समावेश होतो. हा माणूस भारताचील सर्वात वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. ज्या राष्ट्राने त्याला खूप काही दिले त्या राष्ट्राचा तिरस्कार करतो.. असे म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com