ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई l प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.

दिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशके जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती.

दुर्दैवाने त्यांचा हा चित्रपट अपयशी ठरला. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे. आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com