जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर, मुंब्य्रात टायर जाळले

जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर, मुंब्य्रात टायर जाळले

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Former Minister Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत...

आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ठाण्यात (Thane) झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

आव्हाडांवर गुन्हा दाखल (Filed case) झाल्यामुळे त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून ठाणे आणि मुंब्य्रामध्ये (Mumbra) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळले आहेत. तर ठीकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले जात आहे.

दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर आव्हाड यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा (Resignation) देण्याची भूमिका घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com