Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुंबईत मृत्यू

दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुंबईत मृत्यू

मुंबई | Mumbai

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईला येत आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होत आहे…

- Advertisement -

मात्र मेळाव्यापूर्वी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईमध्ये एका कार्यकर्त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीकृष्णा मांजरे असं मृतक कार्यकर्त्याचे नाव आहे. मृतक श्रीकृष्णा मंत्री संजय राठोड यांचे समर्थक होते. मृतक मांजरे हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालूक्यातील हरसुलचा रहिवाशी होते.

शिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवरील ‘ती’ विशेष खूर्ची कुणासाठी?

भिवंडीजवळ शिवशांती लॉन येथे नाष्टा करायला उतरल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने टेंभी नाका येथील सिटीझ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

शिंदे गटाचा दसरा मेळावा, BKC मैदानातून थेट LIVE

- Advertisment -

ताज्या बातम्या