माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश

माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश

मुंबई | Mumbai

येथील समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव आखण्यात येत आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने रात्रीच कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत...

माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानुसार आज सकाळी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तोडक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहेत. माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यासाठी तोडकाम पथक आणि अधिकारी दाखल झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश
शेतकऱ्याने उभारली द्राक्षे, लसूण अन् कांद्याची अनोखी गुढी

जिल्हाधिकारी कार्यालयकडे तोडक कारवाईसाठी आवश्यक यंत्रणा नसल्याने मुंबई महापालिकेचे तोडक कारवाई करणारे कर्मचारी दर्गा परिसरात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी हातोडा पडण्याचे संकेत आहेत.

माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश
सभा घेत बसू नका, शेतकर्‍यांना भेटा; राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सल्ला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com