Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याबेकायदा बांधकामांवर होणार कारवाई; आयुक्तांनी दिले निर्देश

बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई; आयुक्तांनी दिले निर्देश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील (nashik) बेकायदा बांधकामे (Illegal constructions), वाढीव बांधकामे, वापरातील न बदलांतील बांधकामांचा शोध घेण्यासाठी राबविलेली विशेष मोहीम आटोपून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही

- Advertisement -

या मोहिमेत नेमके काय आढळले त्याबाबत नगररचना व करवसुली विभागात (Tax Collection Department) सुरू चालढकलीची अखेर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी दखल घेत दोन्ही विभागांची कानउघाडणी करीत बेकायदा बांधकामांवर कारवाईच्या सूचना दिल्या. पाच दिवसांच्या विशेष शोध मोहीम संपुष्टात येऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला बुधवारी तरीदेखील मोहिमेत नेमके काय आढळले याबाबत गोपनीयता पाळण्यात येत होती.

नगररचना विभाग (Town Planning Department) व करवसुली विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून जबाबदारी ढकलत असल्याने व मोहिमेचे फलित कागदावरच राहिल्याची टीका होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नगररचना विभागाची बैठक घेतली व त्यानंतर करवसुली विभागालाही बोलावून बेकायदा बांधकामाच्या शोध मोहिमेचा आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या.

नगररचना विभागाने सहाही विभाग प्रमुखांकडून या शोध मोहिमेची माहिती मागवून प्रकरणांची वर्गवारी करून पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार नगररचना व करवसुली विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींवर नगररचना विभागाने तत्काळ कारवाई करण्याच्या, तर वापरात बदल केलेले, पूर्णत्वाचा दाखला नसतानाही मिळकतींचा वापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून वसुली करण्याच्या सूचना करवसुली विभागाला दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या