नियम न पाळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार-  जिल्हाधिकारी मांढरे
मुख्य बातम्या

नियम न पाळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार- जिल्हाधिकारी मांढरे

आमदार खोसकर यांनी घेतली जिल्हाधिका-यांची भेट

Abhay Puntambekar

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील विविध कारखाने सध्या कोरोना हॉटस्पॉट झाल्या आहेत. एकाच कारखान्यातील तब्बल ९४ कामगारांना करोनाची बाधा झाली असून याबाबत जर येथील कंपन्या कोविड -१९ चे शासकीय नियम पाळत नसतील तर अशा सर्व कारखान्यांवर कडक कारवाई करून काही दिवस बंद करण्याच्या सूचना आमदार खोसकर यांनी नाशिक जिल्हाधिकारी डॉ. सूरज मांढरे यांची भेट घेवून केल्या. यांवर आपण तत्काळ कारवाई करणार आहोत असे आश्वासन जिल्हाधिका-यांनी आमदार खोसकर यांना दिले आहे.

गोंदे व वाडीव-हे भागातील कामगार व त्यांच्या परीसरात कोराना वाढत असल्याने ज्या कंपन्या शासकीय नियम पाळत नसतील त्या बंद करून त्यांना कडक सुचना देण्यात याव्यात याबाबत सखोल चर्चा झाली असुन पुढचे काही दिवस कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या या कंपन्या आता बंद राहतील हे स्पष्ट झाले आहे. तर कामगार वर्गाने देखील पुढचे काही दिवस काळजी घेवून घरीच रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com