Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याप्रतिबंधित प्लास्टिक वापरल्यास होणार कारवाई

प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्यास होणार कारवाई

नाशिक । प्रतिनिधी ( Nashik )

महापालिका हद्दीत प्लास्टिकचा वापर ( Uses of Plastic )पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत संबंधित प्राधिकरण व अधिकार्‍यांनी सर्वंकश कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका हद्दीत असे प्रतिबंधित प्लास्टिक कोणत्याही जाडीचे अथवा लांबीचे,त्याचा वापर, विक्री साठवणूक इत्यादी पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार (Municipal Commissioner and Administration Ramesh Pawar)यांनी विशेष बैठकीत दिले.

- Advertisement -

महापालिका कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचा एकल वापर प्लास्टिक विक्री, साठवणूक इत्यादी पूर्णपणे प्रतिबंधक करण्यासंदर्भात राज्य स्तरीय टास्क फोर्स समितीची पहिली बैठक आज मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन मुख्यालयात झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी प्लास्टिक वापर, विक्री, साठवणूक याबाबत कार्यवाही संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत उपस्थितांनी विविध विभागांकडे अधिकार्‍यांनी सादर केलेले मुद्दे व सूचना याला अनुसरून तसेच महाराष्ट्र प्लास्टिक अँड नोटिफिकेशन 2018 नुसार शहरात प्लास्टिक बाबत पूर्णपणे प्रतिबंध करणे व त्या कामी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

शहरात सर्व प्रकारच्या एकल वापर प्लास्टिक पूर्णपणे प्रतिबंधित करण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा स्पष्ट करताना आयुक्त म्हणाले की कुठलाही एकल वापर प्लास्टिक कचरामुळे नागरिक घनकचरा हाताळणीयामध्ये विविध समस्या निर्माण होऊन त्यासाठी आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर लागतो.असा अविघटनशील कचरा उघड्यावर वा कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जाळल्याने मानवप्राण्यामध्ये विविध आजार निर्माण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरीत व घातक परिणाम होतो. तसेच हे प्लास्टिक कचरा नाले व गटारात अडकल्याने शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा प्लॅस्टिक कचर्‍यामुळे नदीपात्र अथवा विविध जलस्त्रोत यामध्ये प्रदूषण निर्माण होते. त्याचप्रमाणे जैवविविधतेवर परिणाम होण्याबरोबरच पर्यटनस्थळे शेती वने व परिसंस्था इत्यादी ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतापासून मिळणार्‍या परिसंस्थांचा सेवावर अशा प्लास्टिक कचर्‍यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंमलबजावणी व निकष वर देखील असा प्लास्टिक वापर, कचरा अडसर ठरतो.

शहरातील नागरिक, संस्था, कार्यालये, दुकाने, हॉटेल खानावळ, दूध विक्रेते, भाजी विक्रेते व अन्य सर्व प्रकारच्या कुठल्याही आस्थापना यांनी कुठल्याही प्रकारचा एकल वापर प्लास्टिक वापरात आणू नये, त्याची विक्री, साठवणूक करू नये. या बाबींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. आपल्या नाशिक शहराचे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शहरवासीयांनी नाशिक महापालिकेस सहकार्य करावे.

रमेश पवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक

- Advertisment -

ताज्या बातम्या