एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवले; डॅमेज कंट्रोलसाठी दोन नेते सुरतकडे रवाना

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवले; 
डॅमेज कंट्रोलसाठी दोन नेते सुरतकडे रवाना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde)समर्थक आमदारांच्या सोबत सुरतमध्ये आहेत. ३५ आमदार याठिकाणी त्यांच्यासोबत असल्यामुळे ठाकरे सरकारला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपशी (BJP) वाटाघाटी सुरु असल्याचे बोलले जाते आहे. तर उपमुख्यमंत्रीपदाची भाजपकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ऑफर देण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढण्यात आले असून आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे...

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवले; 
डॅमेज कंट्रोलसाठी दोन नेते सुरतकडे रवाना
“बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण...”; एकनाथ शिंदेंचं ट्विट

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वर्षा निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. वर्षावर 33 हून अधिक आमदार हजर असल्याचा शिवसेनेने (ShivSena)दावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात झाली, असून आज दुपारी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे दोन नेते सूरतला रवाना झाले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दोघेही नेते एकनाथ शिंदे यांची मनधरणी करतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे शिंदे यांची दुपारची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.

शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचे सरकार अमान्य असल्याचे समजते. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे. तर राजकीय विश्लेषक सांगत आहेत की, मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोलला खूप उशीर झाला असून शिवसेनेच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवले; 
डॅमेज कंट्रोलसाठी दोन नेते सुरतकडे रवाना
कडवट शिवसैनिक अशी आहे एकनाथ शिंदेंची ख्याती

राजकीय घडामोडी घडत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सायंकाळी महत्वाची बैठक होणार असून या बैठकीतून काय निष्पन्न होणार हेदेखील पाहण्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com