Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : जिल्हा बँकेच्या कारवाया थांबविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाला ग्वाही

Video : जिल्हा बँकेच्या कारवाया थांबविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाला ग्वाही

निफाड | रावसाहेब उगले | Niphad

नाशिक जिल्हा बँकेकडून (NDCC Bank) जमिन जप्तीची (“र” १००-८५) कारवाई थांबविण्यासोबतच सक्तीची वसुली होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकरी संघर्ष संघटना, शेतकरी संघटना समन्वय समिती व नाशिक जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले…

- Advertisement -

सह्याद्री अतिथी गृहावर गुरुवारी (दि.२०) सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक जिल्हा बँकेकडून करण्यात आलेल्या कारवाया त्वरित मागे घेणार, दोन दिवसांत प्रधान सचिवांसोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांची पुढील बैठक होऊन शासन आदेश (जीआर) काढला जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

नाशिक कृउबा निवडणूक : व्यापारी गटातून ‘हे’ बिनविरोध

दरम्यान, मागण्या मान्य होण्यासाठी सरकार प्रसन्न झाल्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत म्हणून शुक्रवारी (दि. २१) होणारा यज्ञयाग होणार असल्याचे आंदोलन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पिंपळगांव बाजार समिती निवडणूक : दोन पॅनलमध्ये लढत

या शिष्टमंडळात शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुषार गांगुर्डे, दत्तात्रय सुडके, दिलीप पाटील, अब्दुल शेख, केशव कदम सकाळीच मुंबईला रवाना झाले आहेत. तर नाशिकहून मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष महेश लासुरे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, अमित गांगुर्डे, मनोज घोडके आदींचा समावेश आहे.

नाशिक कृउबा निवडणूक : पिंगळेंच्या नेतृत्त्वाखाली पॅनल जाहीर; ‘हे’ आहेत उमेदवार

- Advertisment -

ताज्या बातम्या