शिवसेनेला दुसरा झटका; अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई

शिवसेनेला दुसरा झटका; अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई

जालना | Jalna

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला (Shivsena) एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे...

काही महिन्यांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. तसेच खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवरदेखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता ईडीने खोतकर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

शिवसेनेला दुसरा झटका; अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई
आणखी एक ट्विस्ट; आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच 'नॉट रिचेबल'

ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे.

शिवसेनेला दुसरा झटका; अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई
शरद पवार ठरणार मविआचे 'संकटमोचक'; थेट एकनाथ शिंदेंचीच पाडणार विकेट?

शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com