Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकोविड सेंटरमध्ये निकृष्ट भोजन आढळल्यास कारवाई

कोविड सेंटरमध्ये निकृष्ट भोजन आढळल्यास कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात असून त्याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत असल्याची गंभीर दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली अाहे. निकृष्ट जेवण आढळल्यास सबंधित ठेकेदारावर कारवाई केली जावी अशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिल्या.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात करोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून जणू करोनाचा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. दिवसाला चार हजार पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत असून बेड अपुरे पडत अाहे. ते बघता शहरातील मागील काळात बंद केलेले कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु केले जात आहे. होम आयसोलेशन रुग्ण करोना स्प्रेडचे मुख्य कारण ठरत असल्याने त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

या ठिकाणी रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाश्ता देण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदार नेमण्यात आले आहे. मात्र, ठेकेदारांकडून रुग्णांना पौष्टिक जेवण दिले जात नसल्याचे समोर येत असून त्याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहे.

वेळेवर जेवण व नाश्ता मिळत नसून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्याची गंभीर दखल पालकमंत्री भुजबळ यांनी घेतली असून या तक्रारी दूर करुन तत्काळ रुग्णांना चांगले जेवण द्या अशा सूचना त्यांनी महापालिका आतुक्त जाधव यांना दिल्या. तसेच भोजन पुरविणार्‍या ठेकेदार‍ने कर्तव्यात कसूर केल्यास सबंधित ठेकेदारावर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या