
नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याच्या प्रत्यनात असणाऱ्या दोघा संशयितांच्या अंबड पोलिसांनी ( Ambad Police Station)मुसक्या आवळत त्यांच्याकडून चार कोयत्यांसह तीन तलवारी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी (Yuvraj Patki )यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही टवाळखोर मुले कोयत्यांचा वापर करून दहशत निर्माण करीत असल्याने त्यांचा तात्काळ शोध घेवून कारवाई करण्याचे आदेशित केले होते. यावरून अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्क ऍक्टिव्हेट केले.
पोलीस शिपाई समाधान शिंदे व जनार्दन ढाकणे यांना गोपनिय माहितीनुसार म्हसोबा मंदिर, म्हाडा कॉलनी, अंबड, येथे काही टवाळखोरांनी मंदिराचे मागे तलवारी लपवुन ठेवुन, धारदार लोखंडी कोयते बेकायदेशीरपणे बाळगुन फिरत आहेत. पोलिसांनी याची खात्री करून गुन्हे शोध पथकाचे सपोनि वसंत खतेले, अंमलदार मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, प्रविण राठोड, घनश्याम भोये, अनिल ढेरंगे, दिपक जगताप, संदिप भुरे, वाघ यांनी सापळा रचुन संशयित गोपाल दिलीप डुगलज( १९, रा म्हाडा कॉलणी, जाधव संकुल, अंबड, नाशिक व प्रविण उत्तमराव गायकवाड, (१९, साईबाबा मंदिराजवळ, पंडीतनगर, भाजीमार्केट, नवीन, नाशिक) यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ०३ तलवारींसह ०४ धारदार लोखंडी कोयते हस्तगत केले.
या प्रकरणी पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितां विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रविंद्र पानसरे, व पोलीस शिपाई दिपक शिंदे करीत आहेत.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांच्या आदेशानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही कुणीही दहशत माजविण्याचा प्रकार करत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांना माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
युवराज पतकी ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस ठाणे