Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअबब! लॉकडाऊनमध्ये 'एवढ्या' नागरीकांवर कारवाई

अबब! लॉकडाऊनमध्ये ‘एवढ्या’ नागरीकांवर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर शहर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. 2 ते 9 सप्टेबर दरम्यान 333 तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत 60 हजार 502 नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात वाहनचालक तसेच मास्कचा वापर न करणारांचा समावेश आहे….

- Advertisement -

शहरात करोनाचा प्रभाव धोकादायक पद्धतीने वाढतो आहे. यामुळे लॉकडाऊन शिथिलता दिली असली तरी नियम कडक करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणारांवर शहर पोलीसांकडून कारवाई सुरू आहे.

बाजारपेठ सुरळीत करण्याचा प्रयत्न पुन्हा थांबवावा लागला. अस्थापनांच्या वेळा 10 ते 7 अशी करण्यात आली असून, सांयकाळी 7 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी नियम कडक करण्यात आले आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर शहरातील सर्व 13 पोलिस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

मास्क न वापर करणार्‍या 20 हजार 969 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. करोना रोखण्यात मास्कचा हातभार लागतो. दुर्दैवाने नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येते आहे. शहर पोलिसांनी मास्कचा वापर न करणार्‍यानागरिकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. 23 मार्चपासून आतापर्यंत अशा प्रकारे 60 हजार 502 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दुचाकी तसेच चार चाकी वाहन वापरण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. मात्र, वाहनचालक हे नियम डावलतात. डबल शीट प्रवास केल्या प्रकरणी 495 तर, विनाकारण फिरणार्‍या पाच कारचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

नाईट पॅट्रोलिंग, नाकाबंदी कडक असून, रात्रीच्या वेळी संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अशांकडून आतपार्यंत पोलीसांनी 4 कोटी 2 लाख रूपयांचा दंड वसुल केला आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून, मास्कचा, वाहनांचा योग्य पद्धतीने वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या