Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी 'इतक्या' जागेचे संपादन

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी ‘इतक्या’ जागेचे संपादन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प (Nashik-Pune railway project) आता सुसाट वेगाने धावणार आहे. ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे…

- Advertisement -

या हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनासाठी आवश्यक १ हजार ४५० पैकी ३० हेक्टर खासगी जागा संपादन करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (MRIDCL) देण्यात आली आहे, तसेच सरकारी आणि वनजमीन संपादनाचीही अत्यंत प्रक्रिया सुरू आहे.

पुणे-नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला (Mumbai) येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही मार्गिका पुणे (Pune), नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी १०२ गावांमधील एक हजार ४५० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

23 गावात भूसंपादन

जिल्ह्यातील नाशिक (Nashik) आणि सिन्नर (Sinnar) अशा दोन तालुक्यांतील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, (नाशिक), वडगाव पिंगळा, चिचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिपी, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी खुर्द आणि बुद्रुक, नांदूरशिंगोटे, चास नळवंडी (सिन्नर) अशा २३ गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या