आधारतीर्थ आश्रमातील बालकाच्या हत्येप्रकरणी संशयित ताब्यात

आधारतीर्थ आश्रमातील बालकाच्या हत्येप्रकरणी   संशयित ताब्यात

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलासाठी त्रंबकेश्वर ( Trimbakeshwar )तुपादेवी फाटा येथील आधार तीर्थ आश्रम आहे. या आधार तीर्थ आश्रमात आलोक अशोक शिंगारे वय 4 वर्ष याचा मृतदेह दिनांक 22 रोजी सकाळी आश्रम परिसरातच संशयास्पद रितीत आढळला होता. त्रंबक पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करून मंगळवारी रात्री अज्ञाता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

मंगळवार बुधवार व आज गुरुवार अशा तीन दिवसात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्रंबक पोलिसांनी अथक तपास केला होता. कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून पोलीस माहिती घेत होते. वीस बालकांसह 90 विद्यार्थी आश्रमात असल्याने बालके लक्षात घेऊन त्रंबकेश्वर पोलिसांनी अत्यंत संयमाने कौशल्याने तपास करीत आश्रमातील 14 वर्षीय बालकाला ताब्यात घेऊन विश्वासपूर्वक माहिती काढल्यानंतर सदर बालकाने खुनाचे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले

दरम्यान , आधारतीर्थ आश्रमातील( Aadhartirtha Aashram ) 4 वर्षीय बालकाच्या खून प्रकरणी 14 वर्षीय विधी संघर्षशीत बालकाला उद्या सकाळी बाल न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती त्रंबकेश्वर पोलिसांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com